नागपूर - नववर्षाच्या स्वागतासाठी शहरातील हॉटेल सज्ज झाले असून 30
हॉटेल्सचे प्रवेशशुल्कही ठरले आहेत. या हॉटेलमध्ये एंट्रीकरिता किमान 999
रुपये चुकवावे लागणार आहे. कुटुंबांसह तसेच कपल्सला प्रवेशासाठी जवळपास 5
हजार रुपये मोजावे लागणार आहे. तूर्तास कार्यक्रम काय, हे गुपित ठेवण्यात
आले आहे. मात्र, रात्रभर मौज व आनंद घेता येईल, एवढी हमखास ग्वाही हॉटेल
व्यवस्थापनातर्फे दिली जात आहे.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहरात सर्वत्र जल्लोष असेल. रस्त्यांवर पोलिसांचा पहारा असल्याने हुडदंग करता येणार नाही. परिणामी, अनेकांची धाव हॉटेलमध्ये राहणार आहे. हीच संधी साधून बहुतांश हॉटेल्स व्यवस्थापनाने कार्यक्रमांची आखणी केली आहे. मोठ्या हॉटेल्समध्ये कपल्स मस्ट असल्याने अनेक तरुणांचे लक्ष छोट्या हॉटेल्समध्ये राहणार आहे. गटातटाने व मित्रांचे ग्रुप या हॉटेल्समध्ये नववर्षाचे स्वागत करणार आहे. त्यादृष्टीने हॉटेल्सनेही विविध प्रकारचे पदार्थ व जेवणाची व्यवस्था केली आहे. सोबतीला डीजे, आर्केस्ट्रा आणि खेळातून बक्षिसांची लयलुटांचीही संधी उपलब्ध करून दिली आहे. विविध स्पर्धाही यानिमित्ताने घेतल्या जाणार आहेत. सन अँड सॅंड, हॉटेल सेंटर पॉइंट रामदासपेठ आणि बॉलीवूड सेंटर पॉईट, हॉटेल प्राईड, तुली इम्पेरिअल, तुली इंटरनॅशनल, फियोना लाउंज आदी हॉटेल्समध्ये बुकिंग जवळपास झाल्यात जमा आहे. याशिवाय, सदर, सी.ए. रोड, धरमपेठ, वर्धा मार्गावर असणाऱ्या इतर हॉटेल्समध्येही बऱ्यापैकी विचारपूस झाली आहे. त्यामुळे नाही म्हणायला नववर्षानिमित्त हॉटेल्सची कमाईही वाढणार आहे.
हॉटेल्ससोबतच लॉन व इतर ठिकाणीही कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. क्रेझी केसल, चोकर धानी, कामठी मार्गावरील लॉन्स, वर्धा रोड, अमरावती रोड, छिंदवाडा मार्ग आदी भागांतील धाब्यांवरही गर्दी राहणार आहे. यंदा रात्रभर बिअर बार खुले राहणार आहे. मात्र, मद्यपींवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. शहरातील काही भागांमध्ये वस्तीनिहाय कौटुंबिक कार्यक्रमाच्या माध्यमातूनही नववर्षाचे स्वागत करण्याचे ठरले आहेत. मुंबईतील रॉक बॅण्ड, डीजेंसह शहरातील आर्केस्ट्रा समूह शहरात दाखल झाले आहेत. त्यामुळे सर्वच स्तरावर 2012 च्या स्वागतासाठी वातावरण तापले आहे. एन्जॉय करण्याची प्रत्येकाची आपापली पद्धत अहे. यात नववर्षाचे स्वागत करताना, इतरांना त्रास होऊ नये, असे आवाहन शहर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.
ऑटोचालक देणार 'गुलाबाचे फूल' नागपूर जिल्हा ऑटोचालक मालक महासंघ नववर्षाचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने करणार आहे. प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना गुलाबपुष्प देणार आहे. रामनगर, एलएडी कॉलेज, टी पॉइंट, त्रिमूर्तीनगर, लक्ष्मीनगर चौक, सावरकर चौक, न्यू सुभेदार ले आउट, एम्प्रेससिटी माल, गांधीबाग आदी भागांतील ऑटो पार्किंगमधून ऑटोत बसणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत केले जाणार आहे. महासंघातर्फे वाहतूक पोलिसांचे अभिनंदन करीत वाहतूक सुरक्षा दिवसही साजरा करणार आहे. वाहतूकसंबंधी नियमही यावेळी समजावून सांगितले जातील.

Happy New year
ReplyDelete