Tuesday, December 20, 2011

स्कूल बसच्या संपामुळे पालकांची पंचाईत

नागपूर - शासनाने नियमांचा भडिमार केल्यामुळे संतप्त नागपूर स्कूल बस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काल मंगळवारी दिवसभर आपल्या बसेस बंद ठेवल्यामुळे पालकांना ऐनवेळी आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्याची पाळी आली. असोसिएशनने आपल्या मागण्यांचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले असून आजपासून या बसेस पूर्ववत सुरू होतील.

स्कूल बसमध्ये चढण्याच्या शिडीखाली पायरी असावी, बसमध्ये खांब, सीटखाली विद्यार्थ्यांना बॅग ठेवण्याची व्यवस्था, विद्यार्थिनींसाठी महिला अटेंडंट, स्कूल बस भंगारात काढण्याचा कालावधी, वाहनांचा कर्कश आवाज असू नये, या सर्व नियमांच्या विरोधात नागपूर स्कूल बस असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आज आपल्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील विविध शाळांत विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या 300 बसेस बंद होत्या. यामुळे ऐनवेळी पालकांची पंचाईत झाली अन्‌ त्यांच्यावर आपल्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी सकाळीच बाहेर पडावे लागले. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना भेटून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.आजपासून (ता. 21) स्कूल बसेस नियमित सुरू राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जोग यांनी दिली.

No comments:

Post a Comment