नागपूर : आयुष्याची कातरवेळ थोडी सुखावह व्हावी, यासाठी नागपूरच्या १२२ ज्येष्ठ नागरिकांनी लिव्ह-इनचा पर्याय स्वीकारला आहे.
कुटुंबाने नाकारलेल्या किंवा साथीदार सोडून गेल्याने एकाकीपण आलेल्या
ज्येष्ठांनी एकत्र येऊन लिव्ह इन रिलेशनशिप मंडळ स्थापन केलं आहे. त्याची
रितसर नोंदणीही झाली आहे.
या माध्यमातून आतापर्यंत १२२ ज्येष्ठांनी नवी इनिंग सुरु करण्याचा निर्णय़ घेतला आहे. इतकंच नाही तर लिव्ह-इनला विरोध करणाऱ्या आरएसएसला काळाची पावलं ओळखण्याचा सल्लाही दिला आहे.
लिव्ह-इन मंडळात दाखल होण्यासाठी काही निकष ठेवण्यात आलेत.त्यानुसार ज्येष्ठ व्यक्ती एकटी असावी.त्यांचं वय हे किमान ५५ वर्ष असावं. मात्र मुलांच्या परवानगीची अट यातून ऐच्छिक ठेवण्यात आली आहे
सहली, भेटीगाठी, चर्चासत्रांच्या माध्यमातून ज्येष्ठांना एकत्र आणण्याचं काम लिव्ह-इन मंडळ करणार आहे. मात्र जोडीदार निवडण्याचं काम ज्य़ेष्ठांनाच करावं लागणार आहे. तीन किंवा चार ज्येष्ठांनी एकत्र राहण्यासही मंडळाची हरकत नाहीए. त्यामुळे आता नव्या इनिंगसाठी ज्येष्ठ नागरिकही उत्साही असल्याचं दिसत आहे.

News Taken from STAR Majha
No comments:
Post a Comment