Friday, December 23, 2011

पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीला प्रारंभ

शारीरिक क्षमता चाचणीदरम्यान दौड चाचणीत सहभागी उमेदवार बाजूला उमेदवारांची उंची मोजताना पोलीस कर्मचारी.

गडचिरोली। दि. २२ (शहर प्रतिनिधी)
गडचिरोली व अहेरी पोलीस जिल्ह्याच्या १0५७ जागांसाठी आजपासून शारीरिक क्षमता चाचणीला प्रारंभ झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांची कागदपत्र पडताळणी सुरू होती. आज या शारिरीक क्षमता चाचणीला प्रारंभ करण्यात आले असून ४0 दिवस चालणार असल्याची माहिती आहे.
गडचिरोली पोलीस जिल्ह्यासाठी ५0३ तर अहेरी पोलीस जिल्ह्यासाठी ५५४ जागांसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ४0 हजाराहून अधिक उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. ९ नोव्हेंबर पासून पोलीस भरतीसाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या कागदपत्राची छानणी करण्यात आली होती.
आजपासून शारिरीक क्षमता चाचणीला प्रारंभ करण्यात आले आहे. कोटगल मार्गावर असलेल्या पॉवर हाऊसपासून ते पोलीस मुख्यालयापर्यंत ५ किमीचे अंतर धावणे तसेच १00 मिटर धावणे, लांब उडी, गोळाफेक, पुलअप्स असे विविध शारिरीक क्षमता चाचणी घेण्यात येत आहे. आज पहिल्या दिवशी तब्बल १000 उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली.
अहेरी, गडचिरोली पोलीस जिल्ह्याच्या १0५७ शिपाई पदासाठी ४२ हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. त्यापैकी ४0 हजारच्या जवळपास उमेदवार भरतीसाठी पात्र ठरले आहेत. प्रत्येक दिवशी १ हजार उमेदवारांची शारिरीक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे. आजपासून शारिरीक क्षमता चाचणीला प्रारंभ करण्यात आल्यामुळे अनेक बाहेर जिल्ह्यातील उमेदवार कालपासूनच गडचिरोली दाखल झाले होते. आज पोलीस मुख्यालयाच्या परिसरातही उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत होती.
पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणीसाठी बाहेर जिल्ह्यातून उमेदवार आले असल्याने येथील अनेक लॉज, हॉटेल हाऊस फुल्ल झाली आहेत. त्यामुळे अनेक उमेदवार जिल्हा परिषदच्या खुल्या पटांगणात तर शहरातील सार्वजनिक ठिकाणी मुक्कामी असल्याचे चित्र आहे.
सदर शारिरीक क्षमता चाचणी ४0 दिवस चालणार असून पोलीस अधिक्षक एस. विरेश प्रभू यांनी स्वत: संपूर्ण शारीरिक क्षमता चाचणी प्रक्रियेवर नजर ठेवली आहे. पोलीस मुख्यालयामध्ये उमेदवारांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून मुख्यालयाच्या बाहेरही कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment