Monday, January 16, 2012

थंड थंड नागपूर 75 वर्षांपूर्वी गारठली होती उपराजधानी

नागपूर - गेल्या काही दिवसांत उपराजधानीतील थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. रविवारी या मोसमातील सगळ्यात कमी 6.6 डिग्री सेल्सिअल इतके तापमान नोंदविण्यात आले. आजपासून 75 वर्षांपूर्वी म्हणजेच 7 जानेवारी रोजी उपराजधीच्या इतिहासातील सगळ्यात कमी म्हणजेच 3.9 डिग्री सेल्सिअस इतक्‍या तापमानाची नोंद करण्यात आली होती. विदर्भात गेल्या तीन वर्षांपासून हिवाळ्यातील तापमानात चमत्कारिक घट होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यामुळे रणरणत्या उन्हाकरिता ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील वाटचाल 1937 च्या तापमानाकडे होत असल्याचे संकेत आता मिळत आहेत.
थंडीचा इतका प्रचंड कडाका सहसा बघायला मिळत नाही; पण गेल्या तीन वर्षांत मात्र विदर्भानेदेखील कडाक्‍याची थंडी अनुभवयाला सुरवात केली आहे. सहसा 8 ते 9 डिग्रीपेक्षा खाली न जाणारे तापमान आता 6 डिग्रीपर्यंत पोचायला लागले आहे. 

विदर्भातील या बदलत्या तापमानाबाबत "नीरी' येथील वैज्ञानिक डॉ. रामक्रिष्ण यांना संपर्क साधला त्यांनी या बदलाचे कारण वातावरणातील बदल आणि शहरातील वाढलेली हिरवळ असल्याचे सांगितले. ""सध्या भारतात उठलेल्या शीतलहरीचे कारण पश्‍चिमी विक्षोप (वेर्स्टन डिर्स्टबंसेन) आहे. पश्‍चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी हवा (वेर्स्टलिस) अरबी समुद्रावर वरून जाते. यावेळी पूर्वेकडून येणाऱ्या गरम हवेमध्ये ढगांमध्ये बाष्प साठविले जाते. या "वेर्स्टलिस' हिमालयीन भागात पोचताच येथे हिमवृष्टी होते. दक्षिणेकडे असलेल्या कमी दाबाचा पट्टा उत्तरेतील थंडी ओढण्याचा प्रयत्न करतो व हिमालयातील थंड वारे दक्षिणेच्या दिशेने वाहण्यास सुरवात होते व यामुळे मध्य भारतात व विदर्भात थंडी निर्माण होते. ही प्रक्रिया दरवर्षीच होत असते,'' असे रामकृष्ण यांनी म्हणाले.

जागतिक तापमान वाढीमुळे वातावरणात अनेक बदल होत आहेत. मात्र, विदर्भातील थंडीचा व जागतिक तापमान वाढीचा प्रत्यक्षरीत्या संबंध जोडण्यास त्यांनी नकार दिला. मात्र, गेल्या काही वर्षात वातावरणात होत असलेल्या अनेक बदलांमुळे काश्‍मीरमधील हिमवृष्टीत वाढ झाली आहे, असे त्यांनी सांगितले. यंदा काश्‍मीर व हिमालयातील इतर भागांमध्ये प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी होत असल्याने देशात शीतलहर निर्माण झाली आहे व परिमाणतः विदर्भातील थंडीतदेखील वाढ झाली आहे. याखेरिज शहरात कोठेही मोठी नदी किंवा मोठा तलाव नसल्याने शहरात सहसा ढगाळ वातावरण निर्माण होत नाही. ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होते, मात्र या प्रकारची परिस्थिती शहरात नसल्याने तापमान सतत घट होत आहे. तसेच गेल्या काही वर्षात शहरातील हिरवळीत झालेल्या वाढीचादेखील तापमानावर बराच परिणाम पडत असल्याचे ते म्हणाले.

घटत गेलेले तापमान
वर्ष नीचांकी तापमान
2001 - 8.5
2002 - 7.2
2003 - 6.8
2004 - 9.4
2005 - 9.5
2006 - 7.2
2007 - 10
2008 - 9.1
2009 - 12.1
2010 - 7.5
2011 - 5.7
2012 - 6.6

No comments:

Post a Comment