Monday, January 16, 2012

पत्नीचे दुसऱ्याशी अनैतिक संबंधा मुड़े पति ने केली आत्महत्या

नागपूर - पत्नीचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध अन्‌ सोबतच तिच्याकडून सतत होणारा मानसिक छळ असह्य झाल्याने टोपीविक्रेत्या युवकाने आत्महत्या केली. अजनी येथे आज सकाळी ही घटना घडली. श्रीपती त्रिनाथ जाल (वय 35, रेल्वे कॉलनी परिसर, अजनी) असे या युवकाचे नाव होते.

श्रीपतीचा नूरी नामक युवतीशी प्रेमविवाह झाला होता. त्यांना मुलगा रेहान व मुलगी खुशी ही दोन अपत्ये आहेत. नूरीचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणाहून त्याचे तिच्याशी नेहमीच भांडण व्हायचे. यातून सहा महिन्यांपूर्वी हे दोघेही वेगळे राहू लागले. नूरी आपल्या मुलांसह माहेरी निघून गेली. यापूर्वीही दोघांमध्ये भांडणे झाल्यास ती माहेरी निघून जात असे. यात नूरीचे आईवडील श्रीपतीला धमकावून त्याला त्रास देत. रविवारी नूरी घरी श्रीपतला भेटायला आली होती. यावेळी त्यांचे कडाक्‍याचे भांडण झाले होते. त्या रागावरच आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली असून, त्यात पत्नी व तिच्या सासरच्या छळामुळे हे पाऊल उचलल्याचे नमूद आहे. श्रीपतीच्या कुटुंबीयांनीही नूरीच्या चारित्र्याविषयी सांगत तिच्यासह सासू-सासऱ्याच्या छळामुळेच श्रीपतने आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. श्रीपती टोप्या विकून आपला उदरनिर्वाह करीत होता. पोलिसांनी प्राथमिक तपासात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. -

No comments:

Post a Comment