Sunday, April 22, 2012

तहानलेल्या माकडाच्या पिलाचा दुर्दैवी मृत्यू

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

तहानलेल्या माकडाच्या पिलाचा मृत्यू
तहानलेल्या माकडाच्या पिलाचा मृत्यू
यवतमाळ:  पाण्याच्या तांब्यात नऊ दिवसांपासून घुसमटणाऱ्या माकडाच्या पिलाचा अखेर आज दुर्दैवी मृत्यू झालाय. यवतमाळ जिल्ह्यातील ही करूण घटना आहे.
यवतमाळमध्ये एक माकडाचं पिल्लू गेल्या ९ दिवसांपासून तहानेनं व्याकूळ होतं.
नऊ दिवसांपूर्वी हे माकडाचं पिल्लू एका तांब्यातील पाणी पिण्यासाठी गेलं होतं. मात्र, त्या पिलाने तांब्यात तोंड घातल्यानंतर त्याचं तोंड त्यामध्ये अडकलं.
यानंतर माकडाला सोडवण्यासाठी काहींनी प्रयत्न केले मात्र त्याची सुटका झाली नव्हती. वनविभागानेही यासाठी प्रयत्न केले, पण याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिलं नाही.
अपुरी साधनं, प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा तुटवडा ही वनविभागाची नेहमीची कारणं पुढं केली. संवेदनाशून्य झालेल्या वनविभागानं अशी उत्तरं देणं नवं नाही.

पिलाला पकडण्याचा प्रयत्न केला तर माकडीण पिलाला घेऊन पळ काढत होती. पण माकडीण, पिल्लू आणि वनविभाग यांच्या पाठशिवणीचा हा खेळ काही बघ्यांच्या मनोरंजनाचं साधन बनलं होतं.

दुष्काळाने राज्यातील जनता हैराण झाली असताना, आता या मुक्या प्राण्याचा बळी गेल्याने प्राणी मित्रांमध्ये मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment