Sunday, May 6, 2012

निर्मलबाबांच्या विरोधात नागपूरची अंधश्रद्धा निर्मूलन समिती ( Nagpur Andhshrdha Nirmulan Samiti against Nirmal Baba )

निर्मलबाबा
निर्मलबाबा
नागपूर: निर्मलबाबांच्या अपार लीला समोर येताच त्यांच्याविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि काही समाजसेवी संस्थांनी त्यांच्याविरोधात मोहीमच उघडली आहे. काही संस्थांनी निर्मलबाबांना चक्क मिस्टर नटवरलाल अॅवॉर्ड देण्यात आला आहे.
वर्ष २०११ ते २०१२ या कालावधीतल्या सर्वात मोठ्या ठकसेनाला अर्थात निर्मलबाबांना हा पुरस्कार देण्याचा फार्स पार पडला. नागपुरातल्याच एका व्यक्तीला निर्मलबाबांचा मुखवटा घातला. आणि नटवरलाल पुरस्कार प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलेली खास ट्रॉफी देण्यात आली.
भाबड्या भक्तांना डोसा, वेफर्स आणि आणखी काय काय खायला लावून भरभराटीचा दावा करणाऱ्या निर्मलबाबांना नागपूरच्या समाजसेवकांनी हा पुरस्कार दिला.
मिस्टर नटवरलाल हा बनवाबनवीच्या दुनियेतला ठग होता. ज्यानं लाल किल्ला, राष्ट्रपती भवन आणि ताजमहल विकल्याच्या सुरस कथा आपण आजही ऐकतो आणि तीच ख्याती आहे निर्मल बाबांची आणि म्हणूनच या बाबांच्या अंधश्रद्धेच्या जोखडातून लोकांना मुक्त करण्यासाठी समाजसेवी संस्थांनी हे पाऊल उचललं.

No comments:

Post a Comment