Thursday, January 5, 2012

नागपुरच्या 19 वर्षीय महाविद्यालयीन तरूणीचे अपहरण

नागपूर - सावनेरच्या तीन तरूणांनी नंदनवनमधील एका महाविद्यालयीन तरूणीचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीचा भाऊ आणि एक मित्र अशा दोघांना अटक केली आहे. मात्र, मुख्य आरोपी आणि अपहृत तरूणी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. ते पुण्याला असावे, अशी माहिती मिळाल्यामुळे आज रात्री पोलिस पथक तिकडे रवाना होणार आहे.

रायसोनी महाविद्यालयात शिकणारी ही एकोणवीस वर्षीय तरूणी नंदनवनमधील नातेवाईकांकडे राहत होती. 4 नोव्हेंबरला ती महाविद्यालयात जातो म्हणून घरून गेली ती परतलीच नाही. तिला शोधण्यासाठी पालकांनी ठिकठिकाणच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र, तीचा ठावठिकाणा लागला नाही. अखेर ती बेपत्ता झाल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे दाखल केली. दरम्यान, सचिन गुलाबराव भागवत (वय24), त्याचा भाऊ नितीन तसेच पवन पुरूषोत्तम नाईक (वय30) या सावनेर येथील तरूणांनी तिचे अपहरण केल्याची माहिती पालकांना मिळाली. तिला आरोपीने अज्ञात ठिकाणी डांबून ठेवले, अशीही माहिती कळाल्यामुळे पालकांनी नंदनवन पोलिसात तशी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुरूवारी (ता. 3) अपहरण, डांबून ठेवणे तसेच अन्य आरोपावरून गुन्हे दाखल करून नितीन भागवत आणि पवन नाईक या दोघांना अटक केली. मुख्य आरोपी सचिन भागवत आणि अपहृत तरूणीचा ठावठिकाणा अद्याप पोलिसांना मिळाला नाही. पोलिसांनी अटकेतील आरोपींच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले असता ते सचिनच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, सचिन पुण्यात असावा, असा अंदाजअसून त्याला ताब्यात घेण्यासाठी आज पोलिसांचे पथक तिकडे जाणार आहे.

पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून अपहरण आणि अन्य कलमानुसार गुन्हे दाखल केले असले तरी हे प्रकरण प्रेमप्रकरणातून अथवा एकतर्फी प्रेमातूनच घडले असावे, अशी माहिती पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment