नागपूर - अजनी यार्डात उभ्या असलेल्या कापसाने भरलेल्या मालगाडीवर चढून
पतंगाचा मांजा पकडण्याच्या नादात एक तरुण "ओएचई' तारेच्या संपर्कात आल्याने
गंभीररीत्या भाजल्याची घटना आज (ता. 16) दुपारी पावणेतीनच्या सुमारास
घडली.
सूरज रमेशराव सावसाकडे (वय 22) रा. कुंभारटोली, कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कूलच्या मागे असे गंभीररीत्या भाजलेल्या तरुणाचे नाव आहे. आज (ता. 16) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा तरुण अजनी यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीवर पतंगाचा अडकलेला मांजा काढण्यासाठी चढला. मांजा काढताना हा तरुण एवढा गुंग झाला की, वरच्या बाजूला असलेल्या "ओएचई' तारेचे भान त्याला राहिले नाही. थोड्याच वेळात तो उच्च दाबाच्या "ओएचई' तारेच्या संपर्कात आला. त्याला विजेचा तीव्र झटका बसून तो गंभीररीत्या भाजला अन् मालगाडीच्या खाली कोसळला. त्याला लागलीच शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यास तपासल्यानंतर तो 85 टक्के भाजला असल्याची माहिती दिली.

No comments:
Post a Comment