Monday, January 16, 2012

2001 पास्ण नागपूर पोलिओ मुक्त

नागपूर - भारतामध्ये 2011 मध्ये एक पोलिओग्रस्त सापडला. सध्या एकाही पोलिओग्रस्ताची नोंद नाही. यामुळे भारत पोलिओमुक्तीच्या दिशेने प्रवास करीत आहे. परंतु, नागपूर मात्र दशकापूर्वीच पोलिओमुक्त झाले आहे. 2001 मध्ये उत्तर नागपुरात एक "वाईल्ड' पोलिओग्रस्त आढळला होता. त्यानंतर मात्र एकाही पोलिओग्रस्ताची नोंद नाही.

सलग तीन वर्ष भारत देशात पोलिओग्रस्त आढळला नाहीतर मात्र पोलिओमुक्त भारत म्हणता येईल. 2010 मध्ये एकूण देशामध्ये 42 केसेस आढळून आल्या होत्या. यातील 13 जानेवारी 2010 मध्ये पश्‍चिम बंगालमध्ये आढळून आला होता. याशिवाय नाशिकमध्येही काही केसेस आढळल्या होत्या. भंडारा जिल्ह्यातही एक केस मिळाली होती. परंतु, 2001 मध्ये नागपुरात पोलिओग्रस्त आढळून आला होता. नागपूर विभागातील भंडारा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या पाच जिल्ह्यामध्ये पोलिओ निर्मूलनाची मोहीम 1999 पासून मोहीम राबवण्यास सुरवात झाली. सलग तीन वर्ष पोलिओग्रस्त आढळला नाही, तर मात्र तो विभाग पोलिओमुक्त झाला असे म्हणता येते.

उपाययोजना
पोलिओच्या उच्चाटनासाठी पल्स पोलिओ डोस
नियमित लसीकरण
सुदृढीकरण मोहीम

येथे सर्वाधिक लक्ष
शहरातील झोपडपट्टी, स्थानांतरित नागरिक आणि बांधकाम मजूर तसेच ग्रामीण भाग अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिओ सर्वेक्षण मोहीम सुरू झाली. झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात स्थानांतरित नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. याशिवाय बांधकाम मजुरांमध्ये असे रुग्ण आढळण्याची भीती असते. यामुळे या भागात सातत्याने मोहीम राबवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

19 फेब्रुवारीला पोलिओ डोस
जिल्हा आणि शहरात 19 फेब्रुवारी आणि 1 एप्रिल 2012 रोजी शून्य ते 5 वर्षाखालील मुला-मुलींना पल्स पोलिओ डोस पाजण्यात येणार आहेत. यामुळे पाच वर्षांपर्यंतच्या लहान मुलांनी हा डोस घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment