शिकारी वाघांच्या शोधात असल्याचा अँलर्ट जारी करून अवघे दोन दिवस उलटले
असतानाच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात तब्बल १0
तुकडे केलेला वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूरपासून
अवघ्या १८ किलोमीटर अंतरावरील घंटाचौकीलगतच्या बोर्डा फाट्याजवळ हा प्रकार
घडला. शिकार्यांनी उच्च विद्युत दाबाचा शॉक देऊन वाघाची हत्या केली असावी,
असा संशय अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र
प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात येणार्या मोहर्ली क्षेत्रात सकाळी या
पट्टेदार वाघाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळला.
No comments:
Post a Comment