वर्धा: अमिताभ बच्चन यांनी बिग बी का म्हणतात, याचा प्रत्यय
त्यांच्या कामातून येतो. कारण अमिताभ बच्चन यांनी आता शेतकऱ्यांचा तारणहार
होण्याचा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचं कर्ज बिग
बी यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतला आहे.
अमिताभ बच्चन
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि त्यांच्या आत्महत्यांच्या कथा ऐकल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बच्चन पुढे सरसावले. यातून किसान कर्जमुक्त अभियानीची संकल्पना साकारली. रोटरी इंटरनॅशनलचे कल्याण बॅनर्जी यांच्याशी चर्चा करु अमिताभ बच्चन यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी स्वत:ची भूमिका मांडली.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या वर्धा जिल्ह्याची यासाठी निवड करण्यात आली. जिल्ह्यातील ११४ शेतकऱ्यांना १२ मे रोजी म्हणजेच उद्या सांगवी इथे आयोजित करण्यात आलेल्या सभागृहात धनादेशाचं वाटप केलं जाणार आहे.
यावेळी कर्जदार शेतकऱ्यांचे धनादेश संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात येतील. तसंच शेतकऱ्यांना बँकेतर्फे लगेचच कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र दिलं जाईल. यामुळे हे कर्जमुक्त शेतकरी नवे कर्ज घेण्यास पात्र ठरतील. रोटरीच्या प्रकल्प अधिकारी कल्पना मुंशी आणि अध्यक्ष जॉर्ज पॉल यांची या मदतपर प्रकल्पात महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसदर्भात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. मात्र अमिताभ बच्चन यांच्या मदतीने काही शेतकऱ्याची कर्जातून मुक्तता होण्यास मदत होणार आहे, हे मात्र निश्चित.
No comments:
Post a Comment