Thursday, March 29, 2012

भारतीय विद्यार्थ्याला फसबूक ने १ कोटी ३४ लाखांचं ऑफर केलं (Facebook offered for Indian Student 1.34 crore per year)

अलाहाबाद : सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकने सॉफ्टवेअर इंजिनअरिंगच्या विद्यार्थ्याला १ कोटी ३४ लाखांचं वार्षिक पॅकेज ऑफर केलं आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर समजली जातेय.

अलाहाबादच्या मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्ट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा बी.टेकचा हा विद्यार्थी आहे. सुरक्षेच्या कारणावरून आपलं नाव छापण्यात येऊ नये अशी विनंती या विद्यार्थ्यांनं केली आहे. या विद्यार्थ्यांला २७ मार्च रोजी फेसबुककडून हे ऑफर लेटर मिळालं आहे.

या विद्यार्थ्याला फेसबुकने एकूण वार्षिक पगार १ कोटी ३४ लाख रूपये देऊ केला आहे. या कॉलेजचे डिरेक्टर पी चक्रवर्ती यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

फेसबुकडून मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये मुलाखती घेण्यात आल्या होत्या. टेलिफोनवर या मुलाखतीचे नऊ राऊंड झाले होते. तो विद्यार्थी मूळचा कानपूरचा आहे. शिक्षणपूर्ण झाल्यानंतर कॅलिफोर्नियातील मेनलो पार्कमध्ये तो विद्यार्थी त्यांच्या करिअरला सुरूवात करणार आहे.

No comments:

Post a Comment