Thursday, May 24, 2012

नागपूर विभागाचा निकाल ६७.१३ टक्के लागला आहे ( बारावीचे निकाल खलती पहा )

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीचे निकाल आज जाहीर झाले. राज्याचा निकाल ६५.६१ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी राज्यातून १३ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षी दिली होती. यापैकी आठ लाख ५८ हजार ४१९ विद्यार्थी पास झाले आहेत.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यात सर्वाधिक निकाल पुणे विभागाचा लागला आहे. पुणे विभागाचा निकाल ७९.२७ टक्के इतका लागला आहे.  तर सर्वात कमी निकाल अमरावती विभागाचा लागला असून या विभागात केवळ ४८.८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मुंबई विभागाचा निकाल ७७.०३ टक्के लागला आहे. कोल्हापूर विभागाचा निकाल ७७.२७ टक्के लागला आहे. नाशिक विभागाचा निकाल ७६.९० टक्के लागला आहे. नागपूर विभागाचा निकाल ६७.१३ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल ६७.१३ टक्के लागला आहे.

दुपारी एक नंतर mahresult.nic.in, msbshse.ac.in, mkcl.com या तीन वेबसाईट निकाल पाहता येणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना rediff.com वरही निकाल पाहता येणार आहेत.
विद्यार्थ्यांना दहा दिवसानंतर म्हणजे सहा जून रोजी मार्कशीट संबंधित कॉलेजमध्ये मिळणार असल्याचे उच्च माध्यमिक बोर्डाच्या अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी सांगितले आहे. 
बारावीची परीक्षा झाल्यानंतर साधारणत: जूनच्या पहिल्या आठवडय़ात बारावीचा आणि तिसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र,यावर्षी बहुतेक सर्व मंडळाचे बारावीचे पेपर तपासण्याचे काम नेहमीपेक्षा लवकर झाले होते. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये काही त्रूटी आहेत त्या संदर्भात मंडळाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश राज्य मंडळाने विभागीय मंडळांना दिले होते. त्यामुळे यंदा निकाल लवकर लावता आले. बारावी निकाल लवकर लागल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू होईल.

बारावीच्या निकालासंदर्भात शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत बारावीचा निकाल मेच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश दिले होते.

1 comment:

  1. congratulate all the Passed HSC students

    ReplyDelete