Saturday, March 31, 2012

उद्यापासून नवे कर लागु होणार आणखी पेट्रोल ३ रु. महागणार ( 1st April new taxes will apply & Petrol Rs. 3 Hick )

महागाई
महागाई
उद्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरूवात होत आहे. त्यामुळे सरकारने सर्व्हिस टॅक्स आणि उत्पादक शुल्कात केलेली वाढ उद्यापासून लागू होणार आहे. अर्थात तुमच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे.

देशात पुरवल्या जाणाऱ्या १७ सेवा वगळता सर्व सेवांवर उद्यापासून कर लागणार आहे.

त्यामुळे केबल टीव्ही, विमा, बँकिंग, सारख्या नव्या सेवांसह आधीच्या सर्व सेवांवर १२ टक्के सेवा कर लागणार आहे. त्यात सोने, हिरे, प्लॅटीनम, सिगरेट, पान मसाला, गुटखा, सीमेंट, परदेशी कार, हॉटेलमधलं वास्तव्य, हॉटेलमधलं जेवण, ब्युटीपार्लर, विमानप्रवास, फोनबिल, टिव्ही, एसी, फ्रिज, कोचिंग क्लास, घड्याळं, बँकेचे ड्राफ, कुरियर अशा जवळपास सर्वच गोष्टी महागणार आहेत.
महाग होणाऱ्या वस्तूची यादी फार मोठी आहे. एकूणच तुमचं आमचं जगणं उद्यापासून आणखी महागणार आहे.

1 comment:

  1. Excellent article. Looking for sports physio in Bhopal, please check out here
    Sports Physiotherapy in Bhopal

    ReplyDelete